- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणऋतुध्वज सोशल फाऊंडेशनचे वतीने पाबळ येथे विशेष मुलांसाठी अन्नदान

ऋतुध्वज सोशल फाऊंडेशनचे वतीने पाबळ येथे विशेष मुलांसाठी अन्नदान

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
महाराष्ट्र राज्य ऋतुध्वज सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हेरंब सुधाकर नगरे यांच्या वाढदिवसानिमित्त फाऊंडेशन च्या माध्यमातून पाबळ ता. शिरुर या ठिकाणी विशेष मुलांच्या निवासी शाळेमधे अन्नदान करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
यावेळी ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हेरंब सुधाकर नगरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रेवणनाथ शांताराम गायकवाड, पाबळ गावचे सरपंच सचिन वाबळे, उद्योजक गोरक्ष गावडे, मा.ग्रा.पं.सदस्य. हिवरे वसंतराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, स्वप्निल भुमकर इतर मान्यवर तसेच निवासी शाळेतील शिक्षक स्टाफ उपस्थित होता.


मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व आपल्या निवासी शाळेत यापुढे काय मदत पाहिजे असेल तर आमच्याकडुन मदत करण्यात येईल असे हेरंब नगरे यांनी सांगितले तर सरपंच सचिन वाबळे यांनी नगरे यांच्या सारख्या अनेक व्यक्तींची समाजाला गरज आहे असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले व मुलांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून संगोपन करणे खरोखरच खुप मोठी गोष्ट आहे त्यासाठी शिक्षक स्टाप चे त्यांनी कौतुक केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page