गजानन गव्हाणे पाटील
वाडा पुनर्वसन, ता. शिरुर येथील उप सरपंच पदी संपत नामदेव माळी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. स्वाती परशुराम माळी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विमल आव्हाड यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या अध्यक्ष स्थानी सरपंच योगिता ढोरे या होत्या.
यावेळी माजी सरपंच सुरेश माळी, वसंत भोकटे, सुषमा माळी, नवनाथ माळी, माजी उपसरपंच सचिन माळी, सुरेखा ढोरे, स्वाती माळी, सतीश पवार, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी हत्ते, सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहन माळी, समता परिषद अध्यक्ष संतोष माळी, दिलीप माळी, बबलू पंजाबी, विठ्ठल नायकुडे, ऋतिक देशमुख आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच संपत माळी यांचा ग्रामस्थांचे वतीने पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना संपत माळी यांनी गावाला शुध्द पिण्याचे पाणी, भूमिगत बंदिस्त गटार योजना, अंत र्गत रस्ते, स्ट्रीट लाईट तसेच शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या योजना गावात प्रामुख्याने राबविण्यात येणार असल्याचे आपली लोकशाही शी बोलताना संपत माळी यांनी सांगितले.





