- Advertisement -spot_img
Homeआरोग्यविद्यार्थ्यांसाठीचे महा आरोग्य शिबीर फुलगावच्या धोत्रे विद्यालयात संपन्न

विद्यार्थ्यांसाठीचे महा आरोग्य शिबीर फुलगावच्या धोत्रे विद्यालयात संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
आता पर्यंत फक्त ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात परंतु विद्यार्थ्यांसाठी परिसरातील आयोजित केलेले हे शिबिर नक्कीच फायदेशीर ठरतील असा विश्वास शिबिराचे प्रमुख आयोजक व फुलगावचे माजी सरपंच सोमनाथ खुळे यांनी व्यक्त केला.
जहांगीर हॉस्पिटल पुणे व फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरी उध्दव धोत्रे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. आप्पासाहेब तथा आनंदराव त्रंबक धोत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महा आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल ७५० विद्यार्थ्यांची विविध तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच व फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव खुळे, आण्णा वागस्कर, सुनील वागस्कर, कांताराम वागस्कर, मोहिनी भोंडवे, माजी उपसरपंच राहुल वागस्कर, संस्थापक अध्यक्ष प्रबोधन केंद्र उत्तम भोंडवे, माजी चेअरमन दिलीप वागस्कर, मारुती खुळे, पै. किरण साकोरे, वढू खुर्द च्या सरपंच रसिका चोंधे, सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे, अशोक खुळे, शिवराज खुळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


तब्बल तीन दिवस चाललेल्या या आरोग्य शिबिरात रक्तगट, नेत्र तपासणी, वजन, उंची तसेच इतर आवश्यक तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या निगराणी खाली करण्यात आल्या.
जहांगीर हॉस्पिटल चे जनरल मॅनेजर बिझिनेस डेव्हलमेंट संदीप दत्ता व सहाय्यक मॅनेजर ऑपरेशन रवींद्र मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर जानवळे, डॉ. शिवनारायण दांडगे, डॉ. अंजली पाटील इतर सहकारी मुस्कान शेख, अस्मिता वडघुले, परीचालिका शिला शिंदे, शुभांगी तायडे, मेरूनिसा शेख, मोनिका समुद्रे, मदतनीस महेंद्र कदम, अनिल कांबळे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
तर विद्यालयातील शिबिराचे नियोजन मुख्याध्यापक सुभाष लोंढे यांच्या मार्गर्शनाखाली सतीश केकान, श्रीरंग जाधव, अपर्णा अगवणे या शिक्षकांचे सोबत मदतनीस ज्ञानोबा पाटोळे, संतोष शिंदे यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page