गजानन गव्हाणे पाटील
वाघोली येथील भारतीय जैन संघटना महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या क्रीडा दिनाच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये विविध खेळांचे उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

यामध्ये डान्स, या मध्ये झुम्बा डान्स हे महत्व एरोबिक्स चे महत्व पटवून प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आले. या करिता महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मयुरी पठाण यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून एरोबिक्सचे महत्त्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यानंतर महाविद्यालय मध्ये क्रॉस कंट्री, चेस, कबड्डी, खो-खो व व्होलीबॉल इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांचे व मुलींचे खेळ, संगीत खुर्ची, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन महाविद्यालयाच्या स्पोर्ट मधील विविध क्लबच्या मार्फत करण्यात आले.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. रमेश गायकवाड व प्रकल्पाचे व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी मार्गदर्शन केले.





