- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणतुळापूर गावच्या उपसरपंच पदी अर्चना धनंजय पुजारी बिनविरोध

तुळापूर गावच्या उपसरपंच पदी अर्चना धनंजय पुजारी बिनविरोध

- Advertisement -spot_img

लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
तुळापूर, ता. हवेली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी नुकतीच अर्चना धनंजय पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच सुरेखा शिवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी अर्चना धनंजय पुजारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी जाहीर केले. निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुंफा इंगळे होत्या.


यावेळी माजी सरपंच गणेश पुजारी, माजी उपसरपंच संतोष शिवले, राजाराम शिवले, पवन खैरे, नवनाथ शिवले, सुवर्णा राऊत माजी सरपंच माऊली शिवले, लोचन शिवले, रुपेश शिवले माजी उपसरपंच सुवर्णा राऊत ग्रा.सदस्य वर्षा शिवले, जयश्री शिवले, माजी चेअरमन राजाराम शिवले, अभीनाथ पुजारी, आशा शिवले, वंदना शिवले मा. ग्रा. सदस्य संजय चव्हाण, सहजपूर चेअरमन विजय थोरात, आप्पासाहेब जगताप, पांडुरंग शिवले, शांताराम शिवले, हनुमंत शिवले, अनिल शिवले, योगेश रामकृष्ण शिवले, संपत शिवले आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अर्चना धनंजय पुजारी यांचा शाल पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले. तर गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन तसेच गावच्या वाड्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच अर्चना धनंजय पुजारी यांनी “आपली लोकशाही”शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page