- Advertisement -spot_img
Homeक्राईमलोणीकंद हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षे तडीपारीची कार्यवाही

लोणीकंद हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षे तडीपारीची कार्यवाही

- Advertisement -spot_img

लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा तब्बल चार सराईत गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांवर तडीपारीची कार्यवाही करण्यात आली असून त्यातील दोघांना नुकतेच पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड हद्दीतून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी दिली.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय माकर (रा. गोरे वस्ती रोड, वाघेश्वर नगर, वाघोली) व टोळी सदस्य रोहित मंजुळे, आकाश दंडगुले, हर्षद शिंदे यांच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक बनले होते. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने सदर आरोपींच्या विरोधात अभ्यासपूर्वक तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ ,पुणे शहर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तडीपार आदेश काढण्यात आला.

दिनांक २२/०८/२०२३ पासून तीनही आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले. त्यापैकी टोळी सदस्य रोहित मंजुळे, आकाश दंडगुले यांचेवर २६/८/२०२३ रोजी तडीपारीचा आदेश बजाविण्यात आला.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page