गजानन गव्हाणे पाटील
युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाघोली गावचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पो अं ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, प्रणित साबळे याचेकडे चोरीची रिक्षा असून तो रोहन अभिलाशा सोसायटीजवळ, भावडी रोड, वाघोली, पुणे येथे सार्वजनिक रोडवर रिक्षासह थांबलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सदर माहिती वपोनि रजनीश निर्मल यांना कळवले असता मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केल्याने युनिट ६ चे टिमने त्यास सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याचे ताब्यात ४०,०००/- रू किंमतीची बजाज कंपनीची रिक्षा नंबर MH १२ CT ७३६१ ही मिळून आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करुन लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने केलेली आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





