- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपवार साहेबांनंतर संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे आपल्या मतदार संघाला लाभले : आमदार...

पवार साहेबांनंतर संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे आपल्या मतदार संघाला लाभले : आमदार अशोक पवार

- Advertisement -spot_img

पूर्व हवेलीत खासदार कोल्हे,आमदार पवार यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न
गजानन गव्हाणे पाटील
शेतकऱ्यांना टोमॅटो व कांद्याला चांगला भाव मिळत होता. परंतु कांद्याचे भाव पाडण्याचे पाप हे मोदी सरकारने केले. मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे सरकार आहे. हे कांद्याचे आंदोलन करून खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांना दाखवून दिले. खरे तर मोदी सरकारने नुसती आश्वासने दिली होती परंतु या मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना ही महागाई न परवडणारी आहे. नागरिकांनी विकासाची कामे सुचवा. निधी उपलब्ध करून दिला जाईल. ग्रामसडक योजने अनंतर्गत खासदार कोल्हे यांनी आमल्या शिरूर हवेली मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. कोल्हे यांचे काम संसदेत उत्तम दर्जाचे आहे ते सर्वसामान्य व शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडून प्रश्न सोडविण्याचे काम करीत असून त्यामुळे पवार साहेबांनंतर संसदरत्न खासदार अमोल कोल्हे आपल्या मतदार संघाला लाभले. असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी केले.


पूर्व हवेलतील ग्रामसडक योजने अंतर्गत डोंगरगाव ते वाडेबोल्हाई रस्ता, केसनंद ते हिंगणगाव रस्ता, सोरतापवाडी ते तरडे रस्ता अशा रस्त्यांच्या कामांची भूमिपूजन सभारंभ शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेली आमदार ऍड.अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी बोल्हाई देवीचे दर्शन घेऊन वाडेबोल्हाई पासून भूमिपूजन कार्यक्रमाना व गावांना भेटीगाठी देण्यास सुरुवात केली. यामध्ये डोंगरगाव, अष्टापूर, हिंगणगाव, सोरतापवाडी, तरडे या गावांना भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करीत कोपरा सभा पार पडल्या.


याप्रसंगी वाडे बोल्हाई येथे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवदिप उंद्रे, वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, माजी उपसरपंच संजयराव भोरडे, माजी उपसरपंच विद्याधर गावडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा भोरडे, दिलीप वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेशभाऊ वारघडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बोल्हाई माता पतसंस्थेंचे संस्थापक शिवाजीराव भोरडे, डोंगरगावचे माजी सरपंच अशोक गायकवाड, केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शितोळे, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे, शिरसवडीच्या सरपंच सिमा नामदेव गावडे, डोंगरगावच्या सरपंच रजनी कांबळे, कंत्राटदार तथा आदर्श उद्योजक किरण उंद्रे, माजी सदस्य राहुल शिंदे, सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, निळकंठ केसवड, संध्या भोर, संभाजी ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page