लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
कोल्हापूर येथील पन्हाळा संजीवनी विद्यानिकेतन शाळेतील तीन विद्यार्थी सुवर्ण, कांस्य व रौप्य पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले असल्याची माहिती विद्यालयाचे शिक्षक विजय यादव सर यांनी “आपली लोकशाही” स दिली.

इस्लामपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पन्हाळा येथील संजीवन विद्यानिकेतन या निवासी शिक्षण संकुला मधील इयत्ता आठवीतील श्रेयस बाळासाहेब पाटील (सुवर्णपदक), शाहिद लिंगाप्पा (कांस्यपदक) व इयत्ता नववीतील यश सलगर (रौप्यपदक)असे या तीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.

यातील श्रेयस पाटील या विद्यार्थ्यांची मध्यप्रदेश मधील इंदौर या ठिकाणी राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, मुख्याध्यापक के. के. पोवार, क्रीडा शिक्षक विजय गव्हाणे व रवींद्र मानेेे या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षक व यशस्वी विद्यार्थी, खेळाडूंचे या सर्वांचे शिक्षक वृंद तसेच शाळेतील विद्यार्थी, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.





