- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमचौथ्या राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनीचा यवतमाळ येथे उत्साहात समारोप

चौथ्या राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनीचा यवतमाळ येथे उत्साहात समारोप

- Advertisement -spot_img

कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर सामाजिक संस्थचे आयोजन
यवतमाळ प्रतिनिधी : संजय भोयर
कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर सामाजिक संस्था, यवतमाळच्या वतीने स्थानिक भावे मंगल कार्यालय येथे दिनांक १८ ऑगस्टला छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार मदनभाऊ येरावार यांचे हस्ते व पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांचे हस्ते फित कापून करण्यात आले.
त्यानंतर १८, १९ व २० अशा तीन दिवस ही प्रदर्शनी यवतमाळकरांसाठी खुली करण्यात आली होती. हजारों यवतमाळकरांनी या छायाचित्र प्रदर्शनीला भेट दिली. दिनांक २० ऑगस्टला यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली व माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रमाचे घेऊन छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचा उत्साहात समारोप करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर सामाजिक संस्थेव्दारे यवतमाळ येथील भावे मंगल कार्यालयात तीन दिवसीय राज्यस्तरीय चौथी छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळचे आमदार तथा माजी मंत्री मदनभाऊ येरावारे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन या छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पवन बन्सोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दिनांक २० ऑगस्टला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजयजी मुंदडा तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विवेकभाऊ देशमुख, प्रकल्प अधिकारी रुपेशजी हिरुळकर, आम आदमी पार्टीचे अमनभाई, कॉटन सिटी फोटोग्राफर संस्थापक हे महेश बुराटकर, अतुल राठोड, पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष शितलताई वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी कॉटनसिटी फोटोग्राफर संस्थेतर्फे चार फोटोग्राफरला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्तमराव वानखडे (कलाकुंज फोटो स्टुडिओ), बबन दौजतराव थेराडे, विनय रामनगरीया, अब्दुल गणीभाई यांना जीवन गौरव देण्यात आला. तर फोटोग्राफी क्षेत्रातील अनुपभाऊ अहीर पोलीस मध्ये पीआय म्हणून निवड झाल्याबद्दल व संतोष डोमाळे यांचा ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यावसायीक गटातून प्रथम बक्षीस किरण तांबट (नाशिक), व्दितीय बक्षिस महेंद्र अंबादास मोहोड (अमरावती), तृतीय बक्षीस प्रशांत खारोटे (नाशिक) यांना प्रदान करण्यात आले. हौसी गटातून प्रथम बक्षीस पृथ्वीराज सर्जेराव पाटील (पुणे), व्दितीय बक्षीस मयुर बोरकर (यवतमाळ), तृतीय बक्षीस डॉ.मिनाली राजपूर (अमरावती) यांनी गौरविण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस कुंदन शेषराव आंधळे, मनोज कटकतलवारे, तुषार जगताप, रामदास जगताप, समीर दिक्षीत, अभिनव सोनटक्के, रुक्मीनी आसेगावकर, ऐश्वर्या भामरे, प्रविण पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर भुरे, यांनी केले तर आभार स्वप्नील थुल व संचालन वैलासजी राऊत यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे मयूर भुरे, स्वप्निल स्थुल, शुभम धारगावे, अनिल लोहकरे, संजय भोयर, प्रशांत शेटे, रोहिदास राठोड, देवा रामटेके, शुभम धारगावे, चंदन आंधळे, निखिल डगवार, राजन वाडेकर, निलेश वंजारी, मनिष माहुरे, प्रवीण गणवीर, राहुल रोकडे, इमरान शेख, बबलु महंतो, अक्षय राऊत, राजु वाधवाणी, राजू रंगारी, राज काळे, प्रणव डहाके, मयूर वानखडे यांनी अथक परिश्रम केले. तर पेल्झर डिजीटल प्रेस, गौरव प्रâेमींग आर्ट, सिल्कटच फोटोलूक, आहुजा कलर लॅब, प्रविण लॅब, चैतन्य आर्ट, रोकडे वेडींग आदींनी मोलाचे सहकार्य केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page