लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
काही दिवसांपूर्वी उपअधीक्षक भूमि अभिलेख तासगांव, जिल्हा सांगली कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक व शिपाई यांना राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ व मारहाण करणा-या पदाधिकाऱ्यांना अटक होईपर्यत काम बंद आंदोलन पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख शिरूर कार्यालयात असहकार/लेखणी बंद आंदोलन करत पुकारले असून यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.

या कार्यालयाचे उपाधीक्षक अमोल भोसले, प्रवीण जाधव (न-मू शिरेस्तेदार), संजय गुरव (मुख्यालय सहाय्यक), संतोष काळाने (परीक्षण भूमापन), अमोल गजरे, नितीन कराळे, संदीप पाटील, राम राठोड ,सचिन जाधवर, दिपाली पवार, आरती वर्मा व इतर कर्मचारी त्या प्रमाणे महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख, कर्मचारी संघटना, पुणे विभाग संपात सहभागी झाले आहेत.
तरी नागरीकांनी सहकार्य करावे असे आव्हान विभागातील सर्व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी केले असून यांचे असहकार/लेखणी बंद आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती शिरूर कार्यालयाचे उपाधीक्षक अमोल भोसले यांनी “आपली लोकशाही” स दिली.





