- Advertisement -spot_img
HomeUncategorizedशिरुर - हवेली भाजपा च्या वतीने ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे आयोजन : पै....

शिरुर – हवेली भाजपा च्या वतीने ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे आयोजन : पै. संदीप भोंडवे

- Advertisement -spot_img
लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या सोडव्या लागल्या त्यातच प्रत्येक वर्षी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या लक्षणीय रित्या वाढत चालली आहे. एकीकडे बेरोजगारांना नोकरीची आवश्यकता आहे तर दुसरीकडे कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची यांच्यात दुवा साधत शिरुर हवेली विधानसभा भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

पुण्याच्या सर्व बाजुने औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चाकण, रांजणगाव – कारेगाव, पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहती असो वा हिंजवडी, खराडी आय. टी. हब त्याच प्रमाणे पिंरगुट, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु, फुलगाव, लोणीकंद येथे इंडस्ट्रीत झोन निर्माण झाले असून त्यामध्ये शेकडो लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यामध्ये कुशल – अकुशल, शिकाऊ अशा हजारो कामगारांची कमतरता भासत असून सदर कमतरता भरुन काढण्यासाठी व महाराष्ट्रातील शेकडो बेरोजगार युवकांना नोकरी मिळण्यासाठी शिरुर- हवेली भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ड्रीम जाॅब नावाची वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.

ड्रीम जाॅब या वेबसाईटवर जाऊन बेरोजगार युवकांनी आपली नाव नोंदणी करायची आहे . सदर वेबसाईट चा अ‍ॅक्सेस हा कंपन्यांना देण्यात येणार असुन कंपन्यांना ज्या कामगारांची आवश्यकता आहे त्या कामगारांना कंपनी मेसेज करुन मुलाखती करीता बोलावून घेतील अथवा ऑनलाईन मुलाखती घातल्या जाणार आहेत. वेबसाईट खालील प्रमाणे :- ( Dreamsjob.net.in ) ही सेवा विनामूल्य असुन फक्त अर्जदाराने मोबाईलवर सरल अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील असे क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page