लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात उद्या रविवार दि.२०/८/२३ रोजी दुपारी ३.३० वा. भारतीय जनता पार्टी च्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील व शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद, महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडी अध्यक्ष संदिप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव या रॅलीचे संयोजक असणार आहेत.

या तिरंगा दुचाकी रॅलीमध्ये शिरुर- हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व भाजपा प्रदेश, जिल्हा व मंडल मधील सर्व मोर्चा, आघाडी, पदाधिकारी, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष व भाजपा सभासद व बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या रॅलीची सुरूवात तुळापूर येथील शौर्यपीठ असलेले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळावरून ते पेरणे – कोरेगाव भीमा – सणसवाडी – शिक्रापूर ते तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारका पर्यंत समाप्त होणार असल्याचे वाघोली गावाचे भाजपा उपाध्यक्ष हरिष वाळुंज यांनी “आपली लोकशाहीशी’ बोलताना सांगितले.





