- Advertisement -spot_img
Homeशालेयस्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ व सरपंचांनी केला गौरव

स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ व सरपंचांनी केला गौरव

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन येथील विद्यमान सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्या पुढाकाराने व कर्मवीर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाकडून एका विशेष समारंभात विविध परीक्षेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व मंथन परीक्षा यामध्ये मुलींनी बाजी मारली. यावेळी कर्मवीर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ व सरपंच योगिता नितीन ढोरे यांस कडून विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिका स्वाती बोराडे यांचाही गौरव करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंचांनी गावातील विविध कामांची माहिती देत शाळेत वेगवेगळ्या प्रकारचा निधी मिळवीत शाळेला बहुतेक सुविधांनी स्वयंपूर्ण केल्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे शालेय उपक्रमांमध्ये मैदानी स्पर्धेतही मुलांनी यश संपादन करावं यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी माजी सरपंच नवनाथ माळी, सदस्य संपत माळी, वसंत भोकटे, माजी उपसरपंच सुरेखा ढोरे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितीन ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश बाबर, गणेश मंडळाचे अध्यक्ष मोहन माळी, शालेय शिक्षण कमिटीच्या माजी अध्यक्ष सुनीता नायकुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माळी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढोरे, अविनाश कुंभार ग्रामसेवक आव्हाड मॅडम व मुख्याध्यापक पवार सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
पवार सरांनी प्रास्ताविक केले तर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले व प्रदीप गव्हाणे यांनी आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page