गजानन गव्हाणे पाटील
भारत माता की जय, जय हिंद च्या जयघोषात वाडा पुनर्वसन येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या विद्या शिक्षण प्रतिष्ठाण च्या शिरूर इंटरनॅशनल स्कूल मध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा व प्राचार्य विद्या गणेश साकोरे यांनी आपली लोकशाहीशी बोलताना सांगितले.

येथील द्वजारोहन सरपंच योगिता नितीन ढोरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक नाबगे, सुरेखा ढोरे, संपत माळी, विमल आव्हाड, वसंत भोकटे, विठ्ठल नायकुडे, नितीन ढोरे, वैष्णवी हत्ते आदी मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जिथे पाच वर्षाच्या आतील विद्या शिक्षण प्रतिष्ठानच्या शिरूर इंटरनॅशनल स्कूल ची मुले हातात माईक घेऊन व्यासपीठावर आपल्या देशाविषयी गर्वाने चार शब्द बोलत होते. लहान लहान चिमुकल्यांनी आज भाषण केले.

यामध्ये ज्ञानदा काळे, विराज माळी, कृष्णा सव्वाशे, श्लोक माळी, अथर्व सूर्यवंशी, ओवी शिर्के, वेदांत जाधव, संस्कार चव्हाण या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
स्कूलमध्ये येणाऱ्या मान्यवराचे स्कूलच्या सीनियर टीचर देवश्री हिंगे यांनी स्वागत केले. तर आभार विद्या शिक्षण प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष विद्या साकोरे यांनी मानले.





