- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकर यांचे कार्य गौरवास्पद : सरपंच विक्रम गव्हाणे

स्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकर यांचे कार्य गौरवास्पद : सरपंच विक्रम गव्हाणे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानांतर्गत कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथिल ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गावातील स्वातंत्र्यसेनानी मारुती भिमाजी भांडवलकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून शिलालेखाचे अनावरण करण्यात आल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगताना स्वातंत्र्यलढ्यात कोरेगाव भीमाची मान उंचावणा-या मारुती भांडवलकर यांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये गावामध्ये रोज सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. तर वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच परिसरातील निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा व शपथ देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करतानाच ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी स्वातंत्र्यसेनानी मारुती भिमाजी भांडवलकर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून शिलालेख उभारण्यात आला.
यावेळी घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, मनिषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय फडतरे, संपत गव्हाणे, नामदेव ढेरंगे, बाप्पु दौंडकर, राजेंद्र गवदे स्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकर यांचे वंशज बबन भांडवलकर, विक्रम भांडवलकर, कृष्णा भांडवलकर व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.


ध्वजवंदन बबन भांडवलकर यांच्या हस्ते झाल्यानंतर ग्रामपंचायत शेजारी उभारण्यात आलेल्या शिलालेखाचे अनावरण घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठलराव ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकर यांचे कार्य मोठे असल्याचे सांगत आपल्या गावाला त्यांच्या कार्याची मिळालेली देणगी जपण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असताना भावी पिढीसाठी प्रेरणादायी इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page