लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
पिंपरी सांडस, ता. हवेली येथे आज अनोख्या पध्दतीने स्वतंत्र दिनानिमित्त झेंडावंदन हारुबाई यनभर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यमान ग्रा. सदस्य अशोक भोरडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्या नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीचा कर म्हणजे घरपट्टी असो वा पाणीपट्टी असे विविध ग्रामपंचायत कर प्रामाणिक आणि वेळचे वेळेवर भरले आहे. अशा लोकांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच सामान्य माणसाला सुध्दा झेंडावंदनाची संधी मिळेले या हेतूने ही संकल्पना राबविण्यात आली.

यावेळी लोकनियुक्त विद्यमान सरपंच साधना भोरडे, उपसरपंच गोरख भोरडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक भोरडे, उज्वला निकाळजे, शाळा व्यवस्थापन समितीचे कैलास भोरडे, संतोष कंचे, ग्रामसेवक सारिका दरेकर, मुख्याध्यापक देंडगे मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या मधून एक चांगला संदेश पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये जाईल ह्याच उद्देशाने ही संकल्पना अशोक भोरडे यांनी केल्याचे ‘आपली लोकशाहीची” बोलताना सांगितले.





