- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणखासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून लोणीकंद येथे रक्तदान शिबीर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून लोणीकंद येथे रक्तदान शिबीर

- Advertisement -spot_img

लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
मारुती मंदिर, लोणीकंद येथे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला युवकांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले.
या कार्यक्रमांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात लाखांचे क्रांती दिनानिमित्त रक्तदानाचा + महायज्ञ सुरक्षा कवच प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखांचे सुरक्षा कवच त्यामध्ये ३ लाखांचा अपघाती विमा व ३ लाखांचा जीवन विमा, रक्तदात्यास नातेवाईकास आजीवन १ वर्ष रक्त मोफत राहील आदी योजना राबविण्यात आल्या.

यावेळी आयोजक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय वाळुंज, लोणीकंद गावचे माजी आदर्श सरपंच अनिल होले, माजी उपसरपंच श्रीमंत झुंरूंगे, रवींद्र कंद, अनिल सोनवणे, ग्रा. पं. सदस्य आशिष गायकवाड, माजी सदस्य सदस्य रुपेश गावडे, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रमुख रुपेश कंद, विनोद शिंदे, चेतन शिंदे, जयेश कंद आदी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच चाकण रक्तपेढीचे डॉ. वैष्णवी शिंदे, टेक्निशियन प्रणाली होले, प्राची पारागडे, सिद्धांत शहाणे, राहुल कांबळे इत्यादी सहकार्यांनी नियोजन केले.


लोणीकंद गावातील बहुसंख्य नागरिकांनी रक्तदानास आपला सहभाग नोंदविला असून प्रत्येक रक्तदात्यास रजिस्टर नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उपाध्यक्ष विजय वाळुंज यांनी “आपली लोकशाहीशी” बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page