- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रम७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने "व्यसन मुक्ती व महिला सुरक्षे" साठी ७६...

७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने “व्यसन मुक्ती व महिला सुरक्षे” साठी ७६ किमीची दौड

- Advertisement -spot_img

◆◆ लोणीकंद पोलिसांचा अभिनव उपक्रम ◆◆
गजानन गव्हाणे पाटील
मागील दीड महिन्यापासुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीसांतर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा या विषयांवर विविध प्रकारे विविध पातळीवर वेगवेगळे उपक्रम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला.


भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे संकल्पनेतुन पोलीस ठाणे हद्दीत व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा याकरिता ७६ किमी रिले दौड चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोणीकंद पोलीस ठाणे कडील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या दौडीचे प्रत्येक गावात उत्साहात स्वागत करत पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.


वाघोली येथील बकोरी फाटा येथुन ६.३० वा. रिले दौड ला सुरुवात केली. तेथुन पुढे जेएसपीएम कॉलेज रोड, आयव्ही इस्टेट रोड, केसनंद फाटा, डोमखेल रोड, बायफ रोड, वाघोली गाव, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, केसनंद, वाडेगाव, वाडेबोल्हाई, आष्टापुर, पिंपरी सांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे गाव, वदु खुर्द, तुळापुर, फुलगाव, आळंदी फाटा अशी दौड करत लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे येथे शेवट करण्यात आला.
सदरचे दौड दरम्यान गावोगावी पोलीसांचे चे स्वागत करण्यासाठी शेकडो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी व मोठ्या संख्येने युवकांनी रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी गर्दी केली होती. सदर प्रत्येक ठिकाणी व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा चे अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधत व देश भक्तीपर घोषणा देण्यात आला. या अभिनव उपक्रमामुळे खेडोपाडी उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. शिक्षकांनी व्यवसमुक्ती व महिला सुरक्षा करिता त्यांचे विद्यार्थ्यांना अधिक सजग करुन वेळीच पोलीसांना माहिती देवुन अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठीत नागरिक यांनी सदर उपक्रमाचे स्वागत करुन कौतुक केले.


व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा संदर्भातील दौड़ ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहाने आयोजित करण्यात आली असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page