- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणखानापुरला सर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू भोर तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

खानापुरला सर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू भोर तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
घराशेजारी अंगणात खेळताना सर्पदंश झाल्याने खानापूर, ता.भोर येथील अंगणवाडीत शिकणारा चिमुकला रघुनाथ मारुती भालेराव (वय -५ वर्षे) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
भोर तालुक्यात पाऊसाच्या विश्रांतीने सध्या वातावरणात उकाडा फार वाढला आहे. परिणामी सर्प गारव्यासाठी घरांशेजारील गवत-वेलींचा आधार घेत आहेत. दरम्यान लपून बसलेले सर्प लहान मुले तसेच नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार तालुक्यात वाढले आहेत. त्यातच रघुनाथ भालेराव हा चिमुकला खानापूर, ता.भोर येथील घराशेजारील अंगणात मोठ्या बहिणी बरोबर खेळत होता. यावेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सर्पाने दंश केला. मात्र रघुनाथ हा वयाने लहान व नकळत असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे समजून आले नाही.


रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्याने भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ या चिमुकल्याला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रघुनाथ भालेराव या चिमुकल्याचा सर्पददंशाने मृत्यू झाल्याने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे


सध्या वातावरणात उकडा मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्प घराच्या अवतीभवती गारव्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे. लहान मुलांना सर्प म्हणजे काय कळत नसल्याने अचानकपणे गवत वेलीमध्ये खेळताना सर्पदंश झाला तर मोठी घटना घडण्याचे शक्यता असल्याने चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बुजुर्ग व्यक्तींकडून सांगण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page