- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणछत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर विविध मागणीबाबत माहिती सेवा समितीचे निवेदन

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर विविध मागणीबाबत माहिती सेवा समितीचे निवेदन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
तुळापूर, ता. हवेली येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान स्थळावर विकास कामांच्या व सुरक्षितता बाबतीतल्या विविध मागणीबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.
यावेळी माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट मांजरे, तालुका प्रवक्ते सतीश भगवान शिंगणे तसेच संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जालिंदर कटके आदी यावेळी उपस्थित होते.


स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज बलिदान स्थळी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या शंभुक्तांना भेडसावणाऱ्या अडचणींण बाबत विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून मागण्यात आल्या. १) समाधी परिसरात होणाऱ्या प्रत्येक विवध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या परवानग्या या जिल्हाधिकारी/हवेली प्रांत/जिल्हा परिषद/पोलीस आयुक्त/पोलीस उपायुक्त/त्या हद्दीतील पोलीस ठाणे यापैकी एका कार्यालयातून परवानगी देण्यात यावी. २) समाधी परिसरात देखरेखीसाठी दिवस रात्री दोन सुरक्षा रक्षक तैनात असावे. ३) समाधी स्थळाजवळील स्मशानभूमी पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी. ४) समाधीस्थळी अनेक संघटना हजारो शिवशंभू प्रेमी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आयोजीत करत असतात त्यासाठी स्वतंत्र सभागृह उभारण्यात यावे. ५) पुणे – नगर महामार्गावर तुळापूर फाटा या चौकात छत्रपती संभाजी महाराज समाधीकडे जाण्याचा मार्गावर
फलक लावून मोठी कमान उभारण्यात यावी अश्या विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page