- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणविकास सोसायटीच्या चेअरमन पदी नागेश गव्हाणे पाटील तर व्हा. चेअरमन पदी विमल...

विकास सोसायटीच्या चेअरमन पदी नागेश गव्हाणे पाटील तर व्हा. चेअरमन पदी विमल शिंदे बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक २ च्या चेअरमन पदी अखेर सोसायटी निवडणुकीत सर्वाधिक मतदान घेऊन विजयी झालेल्या नागेश जगन्नाथ गव्हाणे पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी विमल ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शिरुर सहकारी अधिकारी शिरुर डी. वाय. वराळ व संस्थेचे सचिव मधुकर कंद यांनी काम पाहिले.


यावेळी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, माजी पोलीस पाटील विक्रमराव गव्हाणे पाटील व सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, विजय गव्हाणे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, नितीन गव्हाणे, गणेश गव्हाणे, योगेश गव्हाणे, कांतीलाल फडतरे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, मनीषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, घोडगंगेचे माजी संचालक कैलास सोमवणे, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवींद्र गव्हाणे पाटील, भाजपा चिटणीस संपत गव्हाणे, माजी चेअरमन संजय फडतरे, देविदास गव्हाणे, फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, संचालक राजेंद्र गव्हाणे, उद्योजक चेतन गव्हाणे, विनोद साळुंखे, भरत गव्हाणे, अविनाश गव्हाणे, दशरथ गव्हाणे, प्रमोद शिंदे, दीपक गव्हाणे, ऋषिकेश गव्हाणे, विनायक गव्हाणे, डॉ. स्वप्नील गव्हाणे, उमेश गव्हाणे, समीर इनामदार, बापू दौंडकर, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, शिक्षण कमिटीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब राऊत, बापूसाहेब शिंदे,  किरण सव्वाशे, दत्तात्रय गव्हाणे, विकास सोसायटीचे संचालक पंडीत फडतरे, सारीका गव्हाणे, बबुशा ढेरंगे, अशोक गव्हाणे, महादेव फडतरे, अनिल गव्हाणे, अशोक नाबगे, प्रविण गव्हाणे, बाळासो वाडेकर, रामदास कांबळे, संतोष माकर, तज्ज्ञ संचालक सर्जेराव गव्हाणे, नितिन गव्हाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


निवडीनंतर चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा भव्य नागरी सत्कार करत भंडाऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आपली लोकशाही शी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन नागेश गव्हाणे पाटील यांनी शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page