गजानन गव्हाणे पाटील
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव आनंदऋषिजी म. सा. यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त लोकजागृती चळवळ व श्री सकल जैन समाज घोडनदी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ७२ जणानी रक्तदान केल्याची माहिती माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी आपली लोकशाही शी बोलताना दिली.
यंदाचे हे रक्तदान शिबीराचे ३१ वे वर्ष होते. सकाळी दहा ते दुपारी तीन वा पर्यत हे शिबीर पंचायत भवन, शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयासमोर झाले. शिबीरासाठी पुणे येथील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल येथील रक्तपेढी रक्तसंकलनासाठी आली होती.

शिबीराला महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉ. ज्ञानप्रभाजी महाराज साब यांच्या सुशिष्या नियमदर्शनाजी, प्रियलश्रीजी, अनुशजी महाराज साब, संघपती भरत चोरडिया, ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे, पांडुरंगअण्णा थोरात यांच्यासह विविध संस्था संघटना यांच्या कार्यकर्त्यानी भेटी दिल्या.

शिबीरात शिरुर नगरपरिषदेचे माजी सभापती नीलेश खाबिया यांनी ६६ वे तर त्याच्या पत्नी वैशाली नीलेश खाबिया यांनी १४ वे रक्तदान केले. आभार ॲड. ओमप्रकाश सतीजा यांनी मानले.





