लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्षपदी ॲड परेश तुकाराम थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी अध्यक्ष असणारे ॲड वीरेंद्र सावंत यांचा कार्यकाल संपल्यामुळे जेष्ठ वकीलांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त झालेल्या पदासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड परेश तुकाराम थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी ॲड अतुल ताजणे, महिला उपाध्यक्षपदी ॲड भाग्यश्री बोरा, सचिव ॲड संदीप शिंदे, खजिनदार ॲड रोहित पोटावळे, कार्यकारिणी सदस्य ॲड सागर नेटके, अँड प्रज्ञा पवार, ॲड जयवंत शिलवंत, ॲड वैशाली गायकवाड आणि ॲड महेश कर्डिले यांची निवड करण्यात आली.

या सर्वांचे ॲड पंकज भंडारी, ॲड गणेश दरेकर यांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केले.





