लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
लोणीकंद, ता.हवेली येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी मधील ट्विंकल ललित जाधव हिने शाळेत झालेल्या राज्यस्तरीय अक्षरगंगा प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावून लोणीकंद शाळेचे नाव उज्वल केले. तिला धर्मा धुमाळ व संध्या धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.

अगदी लहान वयात उत्तुंग यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. पुणे जि. प. चे माजी अध्यक्ष आणि पी. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद तसेच सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहूल शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, दिगंबर कंद, शिक्षणतज्ज्ञ गोरक्षनाथ झुरुंगे, मुख्याध्यापक एकनाथ शिंदे तसेच गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी ट्विंकल चे कौतुक करत अभिनंदन केले.






