रायगड प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल चणेरे तालुका रोहा जिल्हा रायगड येथे गरजू, होतकरू ४० विद्यार्थ्यांना “स्कूल बॅग “वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विदयालयाचे मुख्याध्यापक तथा रायगड विभाग विद्यासमिती सचिव जोंधळे एस के यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, चणेरा शिवसेना विभागप्रमुख मनोज भायतांडेल, चणेरा शिवसेना उपविभागप्रमुख अरुण कोंडे, विद्यमान ग्रा. पं सदस्य व शिवसेना शाखाप्रमुख खुटल नरेश देवळे, शिवसेना शाखाप्रमुख न्हावे मोहन न्हावकर यांच्या प्रमुख सहकार्याने संपन्न झाला.

न्यू इंग्लिश स्कूल चणेरे ज्ञानसंकुलाचे विद्यमान मुख्याध्यापक तथा रायगड विभाग विद्यासमिती सचिव जोंधळे एस. के यांनी सर्व प्रमुख मान्यवरांना विदयालयातील गरजू होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच येणाऱ्या भविष्यकाळात अशाच प्रकारे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मदत मान्यवरांनी विविध स्वरूपातून करावी असा आशावाद आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील शिक्षक गावित एच. आर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदयालयातील शिक्षक नांगरे जी. डी यांनी आभार भुजबळ एस. जी यांनी मानले.





