गजानन गव्हाणे पाटील
मागील काही महिन्यापासून रिक्त असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूरचे शहराध्यक्ष पदावर आठ दिवसात नवीन शहराध्यक्षाची नेमणूक करण्यात येईल. त्याच प्रमाणे शिरूर नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्या संदर्भात तयारी करण्यात येत असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.
दरेकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्याच्या सत्कार व बैठकीचे आयोजन शिरूर मध्ये करण्यात आले होते. त्याच बरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते व मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी मनसेत यावेळी जाहीर प्रवेश केला. त्याचे ही स्वागत व सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, विधी विभाग तालुकाध्यक्ष आदित्य मैड, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, रवी लेंडे, रवी गुळादे, सुदाम चव्हाण, संजोग चव्हाण, तारूआक्का पठारे, श्याम बेंडभर, नीलेश बाहेती, बंडू दूधाने आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात पक्ष बांधणी व गाव तिथे शाखा काढून पक्षाचे ग्रामीण व शहरी भागात संघटन मजबूत करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या दौरा करण्यात येत आहे. मनसेकडे लोक आश्वासक पर्याय म्हणून पाहत असून पक्ष सोडून गेलेले व अन्य पक्षातील ही नेते पक्षात येण्यास उत्सुक असून पक्षात प्रवेश करीत आहेत. यापुढील काळात शिरूर शहर मनसे अंर्तगत गटातटाचे राजकारण सहन केले जाणार नाही असा इशारा ही दरेकर यांनी दिला.

यावेळी बैठकीत प्रास्ताविक मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी केले. तर आभार रवी लेंडे यांनी मानले.





