- Advertisement -spot_img
Homeक्राईमकोरेगाव भीमामध्ये खोलीत कामगाराचा आकस्मिक मृत्यू

कोरेगाव भीमामध्ये खोलीत कामगाराचा आकस्मिक मृत्यू

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील मारुती मंदिर परिसरातील एका खोलीत परप्रांतीय कामगार मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली असून पोलीस व खोली मालकांनी एकत्र येऊन खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव भीमा, येथील दोस्ती चौक परिसरात सीताराम ज्ञानोबा ढेरंगे यांच्या खोलीत तीन कामगार राहत असून त्यातील शमशाद तफीर राय वय २७ वर्षे धंदा-नोकरी व ओमप्रकाश कुमार रा. बिहार हे आज दि. ०७/०८/२०२३ रोजी सकाळी ०६.३० वा चे सुमारास कंपनीमध्ये कामासाठी गेलो. त्यावेळी सोबत राहणारा त्यांचा मीत्र अमरीतकुमार नन्हक चंद्रवंशी (वय २७ वर्षे मुळ रा. रायपुर चोर पोस्ट रायपुर चोर जि. रोहतास राज्य बिहार) सेकंड शीफट असल्यामुळे तो खोलीमध्येच झोपला होता. त्यानंतर दुपारी ०३.३० वा चे सुमारास कामावर गेलेले दोघे खोलीवर आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. खोलीचा दरवाजा वाजवला असता तसेच अमरीतकुमार यांस आवाज दिला. परंतु खोली मधुन त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही.


त्यानंतर शमशाद तफीर राय याने खोलीमालक सिताराम ज्ञानोबा ढेरंगे यांना फोन करून बोलावुन घेतले. त्यानंतर रुममालक यांनी सदरबाबत शिकापुर पोलीस स्टेशन येथे कळविले असता पोलीस आलेवर शेजारील लोकांचे मदतीने रूमचा दरवाजा तोडला असता आतमध्ये अमरीतकुमार नन्हक चंद्रवंशी हा झोपलेला दिसला. त्यावेळी त्यास हालवुन उठविले असता त्याची काहीच हालचाल दिसुन आली नाही तेव्हा रुग्णवाहिका बोलावुन त्यास शिकापुर ग्रामीण रुग्णालय येथे घेवुन गेलो असता डॉक्टरांनी त्यास ६. ५० वा तपासुन अमरीतकुमार नन्हक चंद्रवंशी (वय २७ वर्षे मुळ रा. रायपुर चोर पोस्ट रायपुर चोर जि. रोहतास राज्य बिहार) हा मयत झाला असल्याचे सांगीतले. या घटनेची माहिती शमशाद तफीर राय यांनी शिक्रापूर पोलिसांकडे दिली.


यावेळी पोलीस पाटील मालन गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार सचिन मोरे आदी घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे पुढील तपास करत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page