- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभाजपा तालुकाध्यक्ष पदी वाघोलीकरांना संधी मिळणार का ?

भाजपा तालुकाध्यक्ष पदी वाघोलीकरांना संधी मिळणार का ?

- Advertisement -spot_img

विजय जाचक यांचे नाव तालुकाध्यक्ष पदवीसाठी चर्चेत
गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये सध्या बदलाचे वारे वाहूत आहे, मोठ्या प्रमाणावर संघटनेमध्ये फेरबदल होत आहे. नुकतीच पुणे जिल्हाध्यक्ष पदी शरद बुट्टे पाटील यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हात इतर सर्वच संघटनांत्मक बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये अनेक तरुण संधी मिळेल आणि संधीचे सोने करण्यास उत्सुक आहेत. त्यातच हवेली तालुका अध्यक्ष संदिप भोंडवे यांना महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडी मध्ये अध्यक्ष संधी दिल्याने अनेक जण हवेली तालुका अध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.


हवेली तालुक्यातील वाघोली हे सर्वात मोठे व महत्त्वाचे गाव असल्याने या वेळेस वाघोली गावाला भाजपकडून तालुका अध्यक्ष पदाची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे . त्यातच हवेली तालुका अध्यक्ष पदासाठी भाजपा हवेली तालुका सरचिटणीस विजय अनिलराव जाचक यांच्या नावाची पक्षात जोरदार चर्चा असल्याचे बोलले जात आहे. आजपर्यंत वाघोली गावाला भाजपकडून तालुका अध्यक्ष पदाची संधी मिळालेली नाही. वाघोली गावाची मतदार संख्या जवळपास साठ हजारच्या आसपास आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकीत वाघोली गाव हे महत्त्वाचे व टर्निंग पॉईंट ठरणारे आहे. त्यामुळे वाघोली गावचा विचार होणे गरजेचे आहे.
वाघोली मधील विजय अनिलराव जाचक हे तालुकाध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. जाचक हे गेल्या चार वर्षांमध्ये भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना यामध्ये आयुष्यमान भारत योजना, उज्वला योजना, इ श्रम कार्ड, सुकन्या समृद्धी योजना, मतदार नोंदणी अभियान,मन की बात इत्यादी कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहे. कोरोना काळात देखील जाचक यांनी अनेक नागरिक मदत करत कोरोना लसीकरण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.


तर रक्तदान, दहीहंडी, गणेशोत्सव, शिबीर या माध्यमातूनही समाज उपयोगी कामे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेली तालुक्यात पक्षाचे संघटन सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहेत. एकूणच विजय जाचक यांचे काम पाहता भारतीय जनता पक्षाकडून विजय जाचक यांना तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल असे भाजपचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
विजय जाचक यांच्या सारख्या तरूण चेहऱ्याला भाजपाने तालुकाध्यक्ष पदाची संधी दिल्यास ते नक्कीच या संधीचे सोने करतील तसेच वाघोली सारख्या मोठ्या गावाला न्याय देखील मिळेल.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page