उत्तम कार्यशैली,पक्षनिष्ठ कामांच्या जोरावर कुटे यांच्याकडून आव्हाळवाडीचे नाव
गजानन गव्हाणे पाटील
आव्हाळवाडी, ता. हवेली येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव गणेश कुटे यांची राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी गणेश कुटे यांची निवड केली आहे. उत्तम समाजिक कार्य, पक्षनिष्ठता, प्रामाणिक कार्यकर्ता,भक्कम पक्षसंघटन, मिळालेल्या पदांवर उत्तम कार्यशैली, पदांवर यशस्वी काम या सर्व उत्तम बाबींचा विचार करून भाजपमध्ये युवा मोर्चात राज्यस्तरावर प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची गणेश कुटे यांना संधी मिळाली आहे.

आव्हाळवाडीचे नाव राज्य स्तरावर नेले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दोन वेळा हवेली तालुक्याचे भाजपचे अध्यक्षपद तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद गणेश कुटे यांनी भूषवले आहे. तालुक्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश हा गणेश कुटे तालुका अध्यक्ष असताना झाला होता. भाजपची संघटना मजबूत करून गावोगावी कार्य केल्याने भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश सचिव पदापर्यंत कुटे यांची वर्णी लागली होती.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील काही निवडक भाजपच्या कार्यकर्त्यांची निमंत्रित सदस्यपदी निवड केली असून यात गणेश कुटे यांचा नुकताच समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. गणेश कुटे यांची राज्य युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, भाजप नेते विक्रांत पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहल लोणीकर, पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, संदीप भोंडवे, रोहिदास उंद्रे, हवेली बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, अविनाश कुटे, प्रदीप सातव पाटील, जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव, विजय जाचक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर, अनुप मोरे, सुदर्शन पाटसकर, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे आदींच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली असून राज्यातील युवा संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे.
गणेश कुटे,नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष-भाजप युवा मोर्चा, महाराष्ट्र





