- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्रीक्षेत्र तुळापूर च्या उपसरपंच पदी सुरेखा राजेंद्र शिवले बिनविरोध

श्रीक्षेत्र तुळापूर च्या उपसरपंच पदी सुरेखा राजेंद्र शिवले बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सुरेखा राजेंद्र शिवले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच सुवर्णा राऊत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गुंफा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुरेखा शिवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी काम पाहिले.


यावेळी माजी सरपंच रुपेश शिवले, अमोल शिवले, माऊली शिवले, गणेश पुजारी, लोचन शिवले, माजी उपसरपंच राहुल राऊत, पवन खैरे, संतोष शिवले, नवनाथ शिवले, राजाराम शिवले, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिवले, अर्चना पुजारी, जयश्री शिवले, माजी चेअरमन राजाराम शिवले, उद्योजक पांडुरंग शिवले, खंडू शिवले, अनिल शिवले, किसन पुजारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असून गावातील तसेच वाड्यावस्त्यांवर ग्रामपंचायत च्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी ‘आपली लोकशाही’ शी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा शिवले यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page