- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसर्व मार्गासाठी पीएमपीएमल चा एक दिवसीय दैनिक पास सुरू करण्याची मागणी

सर्व मार्गासाठी पीएमपीएमल चा एक दिवसीय दैनिक पास सुरू करण्याची मागणी

- Advertisement -spot_img

आमदार अतुल बेनके यांचे पीएमपीएमलचे अध्यक्ष यांना निवेदन
गजानन गव्हाणे पाटील
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी वर्गासाठी पीएमपीएमएलच्या सर्व मार्गासाठी एक दिवसीय दैनिक पास सुरू करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या दैनंदिन प्रवासामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ४० रुपयांचा दैनिक पास सध्या प्रवासीवर्गासाठी देण्यात येतो तर दोन्ही मनपा हद्दीत ५० रुपयांचा पास सुरू आहे. या दैनिक पासला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु ग्रामीण भागातील पीएमपीएमएल प्रवासी वर्गासाठी पुर्वी एक दिवसीय दैनिक पास ७० रुपयांचा होता. सदरचा पास गेली अनेक महिन्यांपासून बंद आहे. ग्रामीण भागात पीएमआरडीएच्या हद्दीत पण मोठ्या प्रमाणावर पीएमपीएमएल बससेवा सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासीवर्ग सदरचा पास सुरू करणेबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्याकडे मागणी करत आहे.


ग्रामीण भागातील आळेफाटा, नारायणगाव, मंचर, शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, लोणावळा, राजगुरूनगर, चाकण, मोरगाव, जेजुरी, सासवड, पौड, खेड शिवापूर आदी भागांतून नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्ताने पीएमपीएमएलने पुणे, पिंपरी चिंचवड शहरात प्रवास करतात. परंतु एक दिवसीय पास दैनिक सुरू नसल्याने प्रवासी वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. शहरातील अनेक प्रवासी वर्गही ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग शहरात कामा निमित्ताने प्रवास करत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी वर्गासाठी पीएमपीएमएलच्या सर्व मार्गासाठी एक दिवसीय दैनिक पास सुरू करणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page