गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळूंगी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महिला आघाडीच्या उपप्रमुख अश्विनी एकनाथ लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच कविता रणसिंग यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सविता करपे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अश्विनी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सदस्य पॕनल प्रमुख विजयदादा रणसिंग यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष तेजेस यादव, ओबीसी मोर्चा बापू काळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रेशमा चौधरी, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, यूवासेना चे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, तालूका प्रमुख रामभाऊ सासवडे, रोहिदास शिवले, आण्णा हजारे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे, ग्रामपंचायत चे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी सविता विजय करपे, ग्रामविकास आधिकारी गुलाब भाऊसाहेब नवले, तलाठी सातपुते दादा यांनी काम पाहिले





