- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकेंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल थिटे तर उपसरपंच पदी ज्योती गावडे

केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल थिटे तर उपसरपंच पदी ज्योती गावडे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
केंदूर, ता. शिरूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल शांताराम थिटे; तर उपसरपंचपदी ज्योती भिवाजी गावडे यांची नुकतीच निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रीया मंडलाधिकारी प्रशांत शेटे, तलाठी रमेश घोडे व ग्रामविकास अधिकारी एस. बी. दरेकर यांनी पाहिले.


केंदूर ग्रामपंचायतीच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांनी एकत्र येऊन पुढील पाच वर्षात आठ सरपंच तर नऊ उपसरपंच करण्याचे ठरले होते. मात्र, पहिल्या ४ सरपंच-उपसरपंचांच्या निवडीनंतर पुढील निवडीबाबत गावातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळ बसला नव्हता. त्यामुळे अमोल थिटे, ज्योती गावडे, प्रमोद पहाड, माजी सरपंच सुनील थिटे, माजी उपसरपंच भरत साकोरे, जयश्री शहाजी सुक्रे, मंगल अरुण साकोरे, सुषमा अशोक पहाड, मंगेश भालेकर यांच्या बंडाने संपूर्ण चित्र बदलले. सरपंच सूर्यकांत थिटे व उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड झाल्या.
उपसभापती सविता पहाड तसेच त्यांचे पती प्रमोद पहाड यांच्या पथ्यावर पडलेल्या या राजकारणात अमोल थिटे सरपंचपदी; तर ज्योती गावडे या उपसरपंचपदी विराजमान झाल्या.

सरपंचपदासाठी अमोल थिटे यांच्या विरोधात शालन अशोक भोसुरे यांनी, तर ज्योती गावडे यांच्या विरोधात योगिता माउली थिटे यांनी अर्ज भरला होता. मात्र, ९ विरुद्ध ८ च्या फरकाने थिटे गावडे यांनी बाजी मारली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page