- Advertisement -spot_img
Homeशालेयसंजीवन विद्यानिकेतन निवासी शिक्षण संकुलमध्ये अण्णाभाऊ साठे व टिळक जयंती साजरी

संजीवन विद्यानिकेतन निवासी शिक्षण संकुलमध्ये अण्णाभाऊ साठे व टिळक जयंती साजरी

- Advertisement -spot_img

विशेष प्रतिनिधी : पोपट मांजरे
संजीवन विद्यानिकेतन निवासी शिक्षण संकुलमध्ये मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक के. के. पोवार व इतर शिक्षकांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून सर्वांनी दिपप्रज्वलन करण्यात आले.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मराठी विषयाचे अध्यापक सागर तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मंगेश पैंजणे यांनी संगीताच्या तालावर “माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली” ही लावणी गायली व संगीताची साथ संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी दिली. तर प्रसाद जाधव यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या जीवनातील कारकिर्दीमध्ये केलेल्या कार्याबद्दलचा उलगडा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे चित्रीकरण चेतन पवार यांनी केले व के. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page