प्रतिनिधी : पोपट मांजरे
हडपसर माळवाडी येथे गस्त घालत असताना क्रमांक नसलेल्या दुचाकी वरील मुलांना पकडण्यात पथकाला यश आले असुन त्यांच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात आली.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे वाहनचोरीवर आळा घालण्यासाठी कारवाईचे अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्री लक्ष्मी इन्क्लेव्ह सोसायटीचे गेट जवळ, जुन्या कॅनॉल शेजारील रोडवर, माळवाडी, हडपसर, पुणे येथे एका बिगर नंबर प्लेट गाडीवर तीन इसम कोणाची तरी वाट पाहत बसलेला आहे.
त्याचेकडे असलेली गाडी ही चोरीची आहे. वगैरे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यात अक्षय सुरेश मगर, प्रविन आत्माराम बुरकुल, शुभम मोहन चव्हाण यांना ताब्यात घेत त्याचे ताब्यात असलेली यमाहा rx100 गाडी बाबत चौकशी करता त्यांनी सदर गाडी हडपसर येथून चोरी केल्याचे सांगितल्याने सदर गाडी पंचनाम्याने जप्त केली आहे. या आरोपीकडून हडपसर, मार्केटयार्ड, लोणी काळभोर, भारती विद्यापीठ या भागातील खालील प्रमाणे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, शिवा जाधव, दत्तात्रे खरपुढे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले यांनी केली आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





