लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
लोणीकंद ते आळंदी फाटा मार्गावर (दि.२८) रोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना व या भागातील रहिवाश्यांना होत असून प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिकांचे कडून करण्यात येत आहे.
शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी या भागातील कारखानदारीमुळे पुणे अहमदनगर महामार्गावर खूप मोठी रहदारी असून त्यात पावसाच्या रिपरिपमुळे शहराकडे जाणाऱ्या नागरीकांचे खूप हाल होऊन मनस्ताप सहन करावा लागला. शहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि सर्वच वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ त्यामुळे पुणे शहराकडे जाणारे रस्ते अपुरे पडत आहे.
त्यातच आळंदी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर उभी करण्यात येतात. तर विरुद्ध दिशेने प्रवास करणारी वाहने ही अनेक आहेत. वास्तविक अशा वाहनांवर कार्यवाही झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





