पुणे : प्रतिनिधी
भर दिवसा घराचा कडी – कोयंडा उचकटून १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याचा गुन्हा लोणीकंद पोलिसात अज्ञात इसमाविरुध्द दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी तात्काळ तपासी पथक अधिकारी सपोनि गोडसे, सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.

या गुन्ह्यातील फिर्यादीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही तपास पथके शिक्रापुर व दौड़ भागात आरोपीच्या शोध घेतला मात्र हाती काही लागले नाही. तपास पथकातील पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांनी खचुन न जाता दोन्ही पथकाने आपले काम चालुच ठेवले.
सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांना माहीती मिळाली की, पिंपरी परिसरातील दिवसा घरफोडी करणारा आरोपी चंद्रकांत उर्फ (चंद्या) अनंत माने (वय वर्षे ३२ वर्षे, रा. पिंपरी) हा कारागृहातुन नुकताच सुटला आहे. त्यावर त्याची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याचे घरी राहत नव्हता, त्यामुळे त्याला पकडणे जिकरीचे झाले होते. त्याच्या जुन्या राहण्याच्या ठिकाणावर दिसला. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचत त्याला शिताफीने अटक केली. यात गुन्हाची माहीती देण्यास टाळाटाळ केली पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याचे सोबत प्रमोद पाटोळे नामक साथीदार याला ही अटक केली.
चोरीस गेलेल्या १३ तोळे सोन्याची लगड असा एकुण ७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीस आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवकरच न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीस मालमत्ता देण्यात येणार आहे. असे काईगडे यांनी सांगितले.
सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुणे, शशीकांत बोराटे पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, संजय पाटील. सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांचे मार्गदर्शना खाली विश्वजीत काईगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद, मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद, सपोनि रविंद्र गोडसे, पो. ह. बाळासाहेब सकाटे, पो.ना. विनायक साळवे, सागर जगताप, पो.शि.साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे शुभम चिनके, आशिष लोहार, गणेश डोंगरे, महिला पो.शि. प्रतिक्षा पानसरे यांनी केली.





