गजानन गव्हाणे पाटील
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती मतदारसंघातील बिबवेवाडी शाखेच्या वतीने १२०० मोफत छत्रीचे वाटप शिवसेना पर्वती विभाग प्रमुख अमोल रासकर व पूजा रासकर यांच्या हस्ते नागरिकांना करण्यात आले.

शिवसेनेची मशाल नागरिकांच्या घरी घरी पोहोचावे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून मशाल चिन्ह असलेले छत्र्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





