- Advertisement -spot_img
Homeशालेयलोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता तर १८ विद्यार्थी...

लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता तर १८ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

- Advertisement -spot_img

लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
लोणीकंद, ता.हवेली येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२३ चा निकाल लागला असून राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले असल्याची माहिती विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक एकनाथ शिंदे यांनी “आपली लोकशाही” स दिली.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- वेदांत सुधीर ढुस २८० गुण (राज्यात ६ वा), हर्षवर्धन श्रीकांत पालवे २७८ गुण (राज्यात ७ वा), अर्जुन श्रीराम कदम २७२ गुण (राज्यात १० वा) हे तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले. तर जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :-  सुरभी शरद जाधवर-२७० गुण (जिल्ह्यात २७ वी), रुद्र शिवाजी बडूरे-२६८ गुण (जिल्ह्यात ३० वा), प्राप्ती प्रमोद जवळगे-२६४ गुण (जिल्ह्यात ५६ वी), चैतन्या अनिल भोसले २५८ गुण (जिल्ह्यात १०९), जान्हवी जीवन वाडेकर २५४ गुण (जिल्ह्यात१८५ वी),आराध्या आत्माराम यमजलवाड २५२ गुण (जिल्ह्यात २०३ वी), श्रद्धा राहुल वागरे -२५२गुण (जिल्ह्यात २१० वी), प्रीती अतुल मालपे २४६ गुण (जिल्ह्यात ३०५वी), विघ्नेश मनोहर मोरे २४६ गुण (जिल्ह्यात ३०९ वा), श्रेयश संजय कदम २४६ गुण (जिल्ह्यात ३१२वा), संस्कृती सोमनाथ खैरे २४६ गुण (जिल्ह्यात ३१६वी), साई किरण शिंदे २४४ गुण (जिल्ह्यात ३४६वा), आदित्य अजितसिंग राजपूत-२४० गुण (जिल्ह्यात ४३८ वा), जान्हवी अजित जोडगुद्री २३६ गुण (जिल्ह्यात ५११ वी), आर्यन पृथ्वीराज सांगडे २३६ गुण (जिल्ह्यात ५४१वा), समर्थ गणेश धर्माधिकारी २३४ गुण (जिल्ह्यात ५६२वा),अथर्व चंद्रकांत जाधव-२३४ गुण (जिल्ह्यात ५६५वा), साक्षी दीपक भंडलकर २३४गुण (जिल्ह्यात ५७७ वी), शिवम प्रकाश मराठे २३० गुण मिळवून १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मनोज म्हाळसकर, संगिता भालेराव या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


तर माजी मुख्याध्यापक हंबीरराव लंघे, केंद्रप्रमुख मोहन भालचिम, विस्तार अधिकारी आशा बांगर, गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे, सर्व शिक्षकवृंद, यशस्वी विद्यार्थी या सर्वांचे पुणे जि. प. चे माजी अध्यक्ष व पी.डी.सी.सी.बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पूजा प्रदीप कंद, सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहूल शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, शिक्षणतज्ञ गोरक्षनाथ झुरुंगे व शा.व्य स.सर्व सदस्य, आजी माजी पदाधिकारी, लोणीकंद ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page