गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ग्रीन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पानांच्या वस्तू तयार करून आणल्या होत्या. वृक्षांच्या पानांचा मुकुट परिधान करून आले होते. तर झाडांच्या बियांचे वाटप याप्रसंगी विद्यार्थ्यांना करण्यात आले.

माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती चे शिरुर तालुकाध्यक्ष धर्मराज बोत्रे, माहिती सेवा समिती राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या माध्यमातून बिया व १ हजार पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, अध्यक्ष भगवान भंडारे, उपाध्यक्षा मोहिनी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, उद्योजक व माजी चेअरमन संजय फडतरे, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, अनिता झावरे, शिल्पा मेस्त्री, निर्मला मुरकुटे, शीतल ताठे, गीता ढगे, अश्विनी उन्हाळे, मिलिंद गायकवाड, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, आशा शिवले, सुजाता गवळी, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया चौधरी, सुवर्णा देशपांडे, सागर वाणी, तनुश्री नायक आदींनी केले.





