गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा परिसरातील आनंद पार्क भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आनंदनगर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थ व माजी सरपंच विजय गव्हाणे यांचे कडून होत आहे.
सायंकाळच्या वेळी या भागातील रहिवाश्यांना कुत्रे भुंकत असल्याचे निदर्शनास आल्यावर ज्या भागात कुत्रे भुंकत आहेत त्या ठिकाणी पाहिले असता काहींना बिबट्या दिसला. तर काही युवकांनी याचे चित्रीकरण करत गावातील सोशल मीडियावर वायरल केले.
आनंदनगर परिसर हा दाट लोकसंख्या असलेला भाग असून आजूबाजूला देखील मोठी लोकसंख्या आहे. तसेच या भागात शेती व मुबलक खाद्य मिळत असल्याने बिबट्याचे या भागात दर्शन होत आहे. या भागात कामगार वर्ग, विद्यार्थी तसेच जवळच शाळा असल्याने भविष्यात एखाद्या जीवावर बिबट्या हल्ला करण्याची शक्यता असून वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा अशी मागनी सुज्ञ नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.






