लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
स्वराज्याचे धाकले धनी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या श्रीक्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळ परिसरात श्री शंभुराज्येभिषेक ट्रस्ट, संभाजी ब्रिगेड, मायभूमी फाउंडेशन, ऐनएबलर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष अमोल शिनगारे, हेमंत जगताप, संदीप जाधव, ज्ञानेश्वर कोठावळे, संतोष गायकवाड, अशोक बोत्रे, सचिन ओव्हाळ, सुमती नलावडे,तसेच व्याख्याते शेखर पाटील, वैशाली खेमगर, ज्योती सातव यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच सुभेदार चित्रपटांचे निर्माते विनोद जावळकर, जगन्नाथ महाराज,विद्या पाटील, चैत्राली जगताप हे प्रमुख उपस्थित होते. लेखक, वक्ते, कवी, मूकबधिर, अपंगत्व असलेले अनेक शिवप्रेमी बांधवांनी या मोहिमेस सहभाग नोंदविला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगापर्यंत पोहोचविण्याचे काम वा. शी. बेंद्रे यांनी केले त्यांनी राजांच्या चरित्रावर ४० वर्षे अभ्यास करून राजांचे चरित्र समाजापुढे मांडले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तर माहिती सेवा समितीचे प्रवक्ते सतीश शिंगणे यांनी सर्वाचे आभार मानले





