लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
तुळापूर, ता. हवेली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी नुकतीच सुवर्णा विनोद राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच राजाराम शिवाजी शिवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली यावेळी सुवर्णा राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली. असल्याचे ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी जाहीर केले. निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी विघमान सरपंच गुंफा इंगळे ह्या होत्या.
यावेळी माजी सरपंच गणेश पुजारी, माजी चेअरमन रमेश शिवले, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिवले, अर्चना पुजारी, वर्षा शिवले, जयश्री शिवले, राजाराम शिवले, पवन खैरे, नवनाथ शिवले, ग्रामसेवक गणेश वालकोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सुवर्णा राऊत यांचा शाल पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
तर गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी,कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वाड्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच सुवर्णा राऊत यांनी आपली लोकशाहीशी बोलताना सांगितले.






