गजानन गव्हाणे पाटील
ऐन पावसाळ्यात नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत या हेतूने कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ज्ञानराज नगर मधील रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच सरपंच विक्रम गव्हाणे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक शांताराम फडतरे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, शैला फडतरे, भाजपा तालुका सरचिटणीस संपत गव्हाणे, संजय गव्हाणे, रियाज पठाण, विजय करवलकर, महेश कुलकर्णी, दत्तात्रय फडतरे, ठेकेदार महेश गव्हाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्ञानराज नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाल्याने या भागात चांगला व दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती. १८०० ते १९०० मीटर रस्त्यापैकी पहिल्या टप्यात ३५० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले तर दुसऱ्या टप्यातील ९० मीटर रस्त्यासाठी ५ लाख रुपये १५ व्या वित्त आयोगातून तर ५ लाख रुपयांची ग्रामनिधीतून तरतूद करण्यात आली. या अंतर्गत या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा व परिसरातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांसाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून चांगले दर्जेदार रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, स्ट्रीट लाईट आदी सुविधा ग्रामपंचायत पूर्ण करेल असा विश्वास यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे यांनी आपली लोकशाही शी बोलताना व्यक्त केला.





