- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमआरोग्य शिबीर आणि धनुर्वात लसीचे मोफत वाटप

आरोग्य शिबीर आणि धनुर्वात लसीचे मोफत वाटप

- Advertisement -spot_img

निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातील रायरी येथे श्रीदत्त क्लिनिक(डॉ आडमुठे पाटील) यांच्या सौजन्याने आणि रायरेश्वर युवक प्रतिष्ठान, मावळा प्रतिष्ठान, रायरेश्वर मैत्री फाउंडेशन ह्यांच्या सहकार्याने मोफत प्राथमिक आरोग्य शिबीर आणि धनुर्वात लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
या प्राथमीक आरोग्य शिबिराला रायरी गावचे ग्रामस्थ आणि आयोजक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ आडमुठे पाटील, पांडुरंग किंद्रे, देवा म्हसुरकर, राजेंद्र किंद्रे, प्रवीण ढवळे, विजय साळेकर, बाबू दिघे, निलेश धोंडे, अनिकेत किंद्रे, विश्वनाथ किंद्रे, अंकुश किंद्रे, श्रीकांत किंद्रे उपस्थित होते.
या प्राथमिक आरोग्य शिबिराला रायरी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या भागातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० पेक्षा अधिक लोकांना मोफत धनुर्वात लस आणि प्राथमिक उपचार देण्यात आले.


आजच्या ह्या प्राथमिक आरोग्य शिबिर आणि मोफत धनुर्वात लस दिल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ आणि रायरी गावचे कार्यकर्ते ह्यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page