गजानन गव्हाणे पाटील
विनिता प्रकाश जमधडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघोली महिला शाखा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र पुणे शहर महिला अध्यक्षा वनिता वागसकर व इतर मनसैनिकांच्या उपस्थिती मध्ये देण्यात आले.
मनसे अध्यक्ष हिंदूजननायक राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, विभाग अध्यक्ष सुनिल कदम, महिला विभाग अध्यक्षा दिपाली शिर्के यांच्या नेतृत्वाखाली विनिता प्रकाश जमधडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघोली महिला शाखा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राजकारण हे वाईट आहे असे न मानता महिलांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात येणे ही काळाची गरज आहे कारण राजकारण हे समाजव्यवस्था बदलविण्याचे एक मोठे माध्यम आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एकमेक अभ्यासू व जनसामान्याविषयी तळमळ असणारे नेतृत्व आहे. म्हणून येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढीसाठी चांगले योगदान देणार व ‘जगाला हेवा वाटेल’ असा राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर विनिता जमधडे यांनी आपली लोकशाही शी बोलताना दिली.

त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले तर अनेकांनी त्यांनी पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





