लोणीकंद प्रतिनिधी : पोपट शं.मांजरे
कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीचे उपसभापती रवींद्र कंद यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकंद येथील खंडोबा मंदिर वनराई परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी लोणीकंद गावचे विद्यमान उपसरपंच राहुल शिंदे, मा.उपसरपंच ओंकार कंद, भाजपा उघोग आघाडी भाऊसाहेब झुरुंगे, ग्रा.सदस्य सुधीर कंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, भाजपा युवा मोर्चा योगीराज शिंदे, गणेश झुरुंगे, किरण कंद, राजेंद्र कंद, महेंद्र कंद, गणेश कंद, सिद्धांत लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रवींद्र कंद यांनी सर्व युवा तरुणांना वृक्ष लागवडी विषयी सगळीकडे वृक्षतोडीमुळे व शहरीकरणामुळे सिमेंटच्या जंगलामुळे झाडे नष्ट होत आहेत. प्रत्येक एक व्यक्ती एक झाड जागा मिळेल त्या ठिकाणी लावले पाहिजे. त्यामुळे परिसरातील ऑक्सिजन वाढेल व पर्यावरण चांगले राहील. असा संदेश त्यांनी ‘आपली लोकशाही’शी बोलताना दिला.





