- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रागतिक पक्ष राज्यस्तरीय सत्ता परिवर्तन अभ्यास शिबीर ९ व १० जुलै...

प्रागतिक पक्ष राज्यस्तरीय सत्ता परिवर्तन अभ्यास शिबीर ९ व १० जुलै ला पुण्यात

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
प्रागतिक पक्ष राज्यस्तरीय सत्ता परिवर्तन अभ्यास शिबीर दिनांक ९ व १० जुलै २०२३ रोजी अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नाथा शेवाळे यांनी आपली लोकशाही शी बोलताना शिरुर येथे दिली.
ते म्हणाले या शिबिरामध्ये राज्यातील १३ घटक पक्ष सहभागी होणार असून शिबिरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी, जनता दल (सेक्युलर) राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अशोक ढवळे, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे ॲड . सुरेश माने, लाल निशाण पक्षाचे कॉ. व्ही. के. कुलकर्णी, CPI माले लिबरेशन कॉ. अजित पाटील, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, रिपाई सेक्युलर चे शाम गायकवाड, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, श्रमिक मुक्ती दलचे भारत पाटणकर इत्यादी उपस्थित असणार आहेत.


शिबिरात युवा, महिला, दलित, शेतकरी, कामगार, वंचित, बहुजन तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे बदल याविषयी मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. व आगामी काळात महाराष्ट्राच्या जनते समोर सक्षम पर्याय म्हणून प्रागतिक पक्ष उभा राहणार असल्याची माहिती जनता दलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष व प्रागतिक पक्षाच्या अभ्यास परिवर्तन शिबिराचे स्वागत अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page