शिरुर प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान शिरुर यांच्या वतीने शहरातील विविध शाळामधील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंताचा सन्मान करण्यात आला. येथील शिरुर नगरपरिषदेच्या उर्दु स्कुल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी नगरसेवक सुकुमार बोरा, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुन्ना उर्फ आबिद शेख, इक्कबालभाई सौदागर, माजी पंचायत समितीचे सदस्य रामभाउ कदम, माधव प्रतिष्ठानचे रवींद्र सानप, अल बैतुल माल कमिटी शिरुर चे फिरोज बागवान, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा, मनसेचे माजी शहराध्यक्ष रमणलाल भंडारी, नीलेश नवले, नाथा पाचर्णे, सुनील करळे, शोभना पाचंगे, डॉ. अतुलकुमार बेंद्रे, राणी कर्डिले, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शब्बीर खान, शिरुर नगरपरिषद सेंटर शाळेच्या शिक्षीका अनिता धुमाळ, कॉग्रेस आयचे अजिम सय्यद, वसंत बेंद्रे, चंद्रकांत झुंजार, मोहम्मद हुसेन पटेल, महेंद्र ढेरे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब झाडगे, राजेंद्र शेजवळ, कन्हैयालाल दुगड, ॲड. सतीश गवारी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सदस्य व मावळाई प्रकाशन चे प्रमुख डॉ. सुभाष गवारी यांनी केले. त्यात ते म्हणाले की, प्रतिष्ठानने शैक्षणिक साहित्या बरोबर गरजू विद्यार्थ्यांची शालेय फी भरावी, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असुन विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले त्याच बरोबर प्रतिष्ठानचा वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्जवल यश संपादन केलेले विद्यार्थी लोळगे ऐश्वर्या कानिफनाथ, पठाण अलिज्बा गुलाम, अभंग पूनम, सिध्दी अभिजीत ओतारी, कुणाल शेजवळ, ऋषीकेत गायकवाड, खान फुकार्न, आर्शिया पठाण, अकिंता गायकवाड, गौरी मुरगे, गणेश झाडगे, फातिमा शहा, आदिबा शेख, खदिजा बागवान, हर्षदा मुनोत, ऐश्वर्या जामदार, साजिदा सय्यद, गौरी झाडगे, आबिद शेख झैद, आयेशा खान, प्रेरणा बारवकर, प्रतीक्षा बारवकर, दमयंती निकम, कुणाल शेजवळ, डॉ. मेहक शेख, सत्वशिला निकम याचा सन्मान करण्यात आला. तर आयेशा बेगम उर्दु स्कुलचा दहावीचा १००% निकाल लागला बद्दल विशेष सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमात शिरुर नगरपरिषद मराठी शाळा क्र .१ ते ७, विद्याधाम प्रशाला, रयत शाळा, जीवन विकास मंदिर, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांचे मनशांती छात्र विद्यालय, वात्सलयसिंधु संस्था व आश्रमशाळा, आयेशा बेगम उर्दु हायस्कुल येथील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले म्हणाल्या की, विद्यार्थ्याना शिक्षणासाठी उपयुक्त असणारे साहित्य देण्याचे महत्वाचे काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान करीत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे सन्मान ही त्याच्यातील उर्जा वाढविण्याचे काम करते. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या कार्याच्या विद्यार्थ्यानी अभ्यास करावा.
फिरोज बागवान म्हणाले की शिक्षणप्रेमी बना व मुला मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे. रवींद्र सानप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले. आभार कन्हैलाल दुगड यांनी मानले.





